Monday, 20 October, 2008

माझी एक सांज अशी जात नाही...

Tuesday, 14 October, 2008

साद शब्दांना घालेन मी...

नसेल कुणी सोबतीस माझ्या
एकटाच ध्येयाकडे चालेन मी
वाटलंच एकाकी जर का मला
आर्त साद शब्दांना घालेन मी

Tuesday, 7 October, 2008

विश्वासाने माझ्या खांदयावर विसावलीस तू...

विश्वासाने माझ्या खांदयावर विसावलीस तू अन
माझ्या मनातील सारी वादळे मनातच शांत झाली
तुझं छोटं होऊन माझ्या कुशीत मुसमुसत रडण्यानं
मला माझ्या लग्नाआधीच निरागस लेक मिळाली

Monday, 6 October, 2008

अन मग मी माझा राहत नाही...

खुप बोलावसं वाटतं तुझ्याशी
पण शब्द ओठांवर येत नाही
तूही कधीतरी हलकंच हसतेस
अन मग मी माझा राहत नाही

गलबत किनार्‍याकडे हाकारलं नाही...