Friday, February 26, 2010

आनंद या जीवनाचा...

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा


काही आठवतंय का?
साधारण ९४ - ९५ च्या आसपास (किंवा त्याच्या थोडं आधी किंवा नंतर) डॉ. श्रीराम लागूंची "प्रतिकार" नावाची एक मराठी मालिका लागत असे, त्या मालिकेचं हे शिर्षकगीत. एक नितांत सुंदर आणि अर्थपुर्ण गीत. गीतात इतका गोडवा होता की इतक्या वर्षांनंतरही ते मनात घर करून राहीलं. संगणक अभियंता म्हणून काम करू लागल्यानंतर जेव्हा जेव्हा या गीताची आठवण झाली तेव्हा तेव्हा गुगलवर त्याच्या एमपी थ्री चा शोध घेतला, आणि प्रत्येक वेळी निराश होऊन गप्प बसलो. कारण... हे गीत जालावर कुठेच उपलब्ध नव्हतं.

आज सहज म्हणून पुन्हा एकदा शोध घेतला. गुगलने दिलेल्या प्रत्येक दुव्यावर जाऊन पाहीलं. आणि एका दुव्यावर ही युटयूबवरील चित्रफीत सापडली. विक्रांत वाडे नावाच्या गायकाने एका मराठी वादयवृंदामध्ये गायलंय. अगदी मुळ गीताच्या तोडीचं नसलं तरीही खुप छान झालंय गाणं. विक्रांत, धन्यवाद मित्रा. इतक्या वर्षांचा शोध, गाणं मिळत नाही म्हणून मनात असलेली हुरहूर आज संपली...

4 अभिप्राय:

भानस said...

सतिश, अनेक धन्यवाद. छानच आहे हे गाणे. इतक्या वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळाले मस्त वाटले. लगेच उतरवून घेतलयं.:)

Vikrant Deshmukh... said...

अरे मला पण हे हवे होते... फार भूतकाळात नेऊन हैराण करणारे गीत आहे यार !!!!!!

Mohinee said...

धन्यवाद सतीश! मला आता या ओळी हव्या होत्या. गुगल वर तुमचा ब्लॉग मिळाला.. अगदी वेळेवर. नवीन दशकाच्या हरिद्क शुभेच्छा!

Nalini Madhukar said...

धन्यवाद.. सतीश मन फार उदास होते वाटले कुठुन तरी आनंद शोधू तुझा Blog वाचला वाचून आनंद मिळाला