Monday, April 28, 2008

अबाऊट मी...

ते शनीवारी वाशीवरुन धक्काबुक्की करत बस पकडनं ... साडेतीन तासात लोणेरेला पोहोचनं... तिथून अर्ध्या तासात घरी... आणि मग दोन दिवस मस्त ऐश...

ते पॅसीयन प्लस सुसाट वेगाने चालवत अर्ध्या तासात घरून मुगवलीला पोहचणं... अगदी निवांत बसलेल्या गणपती बाप्पाला 'वक्रतुंड महाकाय' म्हणत हाय हेलो करणं...

ते BATU ला स्टाफ्फ क्वार्टरला जाणं... BATU मध्ये मी विद्यार्थी असताना ज्याना सर म्हणत असे तेच पुढे मी लेक्चरर झाल्यावर माझे मित्र झाले... त्या माझ्या सर कम मित्रांसोबत धमाल टाइमपास करणं...

महाडच्या सावित्री नदीवरुन होणारा सूर्यास्त खूप छान दिसतो... केवळ तो सूर्यास्त पाहण्यासाठी बाइकने महाडला जाणं... आणि सूर्यास्त होताच एक अनोखा आनंद घेऊन महाड शहरात न शिरताच माघारी फिरणं...

कामानिमित्त तीन वर्ष मुंबईत काढूनही मी कधीच मुंबईकर झालो नाही... मी मला स्वता:साठी घर घ्यावं म्हणून बाबा खूपच मागे लागले तेव्हा मी पुण्यात घर घेतलं... मुंबईत नाही...

आज मी अमेरिकेत आहे. पुढे मागे जेव्हा भारतात परत येइन तेव्हा पुण्याला जाईन... मुंबईत नाही...

एव्हध मात्र नक्की की मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी... माझं घर म्हटलं की मला आठवेल... माझं वडगाव कॉंड - गोरेगाव जवळच्या एका छोटया खेडेगावामधील घर, ती सावित्री नदीला जाऊन मिळनारी काळ नदी, माझं BATU, माझे BATU मधले मित्र आणी शिवरायाच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली माझी रायगडची भूमी...

1 अभिप्राय:

Yogesh said...

प्रति सतीश गावडे...
नमस्कार...!! मी योगेश जोशी - वय २५ वर्षे, रा. उस्मानाबाद सध्या नौकरी निमित्त मुंबईला असतो. आज प्रथमच आपला ब्लॉग (मराठीतील शब्द माहीत नाहीये) वाचतोय. खुपच छान लिहिता. मला असे छान छान लिहिता येत नसल्या मुले मी फक्त वाचयाचे काम करतो. सो असेच लिहित जा.......
सर्वच कथा अगदी मस्त आहेत्. धन्यवाद ...
योगेश जोशी