Thursday, September 3, 2009

चंपूची जिंदगी

महेंद्र काकांनी अनिकेतच्या या पोस्टला टाकलेली कॉमेंट वाचली आणि माझ्याही डोक्यात त्या कॉमेंटच्या अनुवादाचा मराठी भुंगा भुणभुण करू लागला. मीही एक आय टी मधला चंपू असल्यामुळे त्यातल्या त्यात हा प्रकार बर्‍यापैकी जमला आहे असं वाटतंय. पण तरीही जर अनुवाद भंगार वाटला तर ते कर्तृत्व आमचं, चांगला झाला असेल तर त्याचे श्रेय त्या अनामिक कवीला...


चंपूची बायको खुपच हैराण झाली होती
नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती
चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा
ऑफीसात नुसता काम करत बसायचा

चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा
दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा
डेडलाईन पठठया कधी विसरला नाही
नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही

चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट
त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट
रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला
बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला

असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली
आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली
चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही
कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई

शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली
प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली
बॉसला म्हणाला तू का रे सतावतो मला
बढतीचा लाडू दाखवून येडा बनवतो मला?

प्रमोशन दे नाही तर ईथून निघून जाईन
इन्क्रीमेंट जरी दिलंस तरी तिथेच राहीन
बॉसही उस्ताद म्हणे तू कुणी मोठा नाही
तुझ्यासारख्या चंपूंना इथे काही तोटा नाही

तुझ्यासारखे चंपू इथे पैशाला दहा मिळतात
करीयरच्या शर्यतीत ते उंदरासारखे पळतात
तू नाही दुसरा कुणीतरी इथे भेटेलंच रे मला
तुझ्यासारखाच दुसरा चंपू बनवेन मी त्याला

9 अभिप्राय:

सचिन उथळे-पाटील said...

अगदी झकास झाला आहे अनुवाद.

Mahendra Kulkarni said...

अगदी ओरिजिनल पेक्षा पण सरस झालाय अनुवाद...

सिद्धार्थ said...

झक्कास!!! मस्त, अगदी तंतोतंत जुळून आलाय अनुवाद.

Anonymous said...

वा, मस्त जमलं आहे, खरंच मुळ कवितेपेक्षाही सरस जमलं आहे. अभिनंदन

Deepak said...

अरे सही!... एकदम झक्कासच.. !

Satish Gawde said...

सचिन, महेंद्र काका, सिदधार्थ, अनिकेत आणि भुंगा... तुम्हा सार्‍यांचे मनपुर्वक आभार !

आणि त्या अनामिक कवीचे आभार राहीलेच... त्याने आय टी प्रोफेशनल्सची व्यथा "हिंग्लिश" मध्ये इतक्या ओघवत्या शैलीत व्यक्त केली आहे की त्या कवितेचा मराठी अनुवादही छान झाला.

Tejas Shah said...

Hi kavita mi gujarati madhye vachali hoti. Anuvaad mast jamala aahe.

Photographer Pappu!!! said...

मस्तच झाले आहे. कौन बनेगा चंपू :) खरच रे सॉफ्टवेर इंजिनीयर्स म्हणजे घाण्याचे बैल झालेत...

भानस said...

अरे वा! एकदम मस्त झालाय अनुवाद.आवडला.