Friday, February 26, 2010

आनंद या जीवनाचा...

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा


काही आठवतंय का?
साधारण ९४ - ९५ च्या आसपास (किंवा त्याच्या थोडं आधी किंवा नंतर) डॉ. श्रीराम लागूंची "प्रतिकार" नावाची एक मराठी मालिका लागत असे, त्या मालिकेचं हे शिर्षकगीत. एक नितांत सुंदर आणि अर्थपुर्ण गीत. गीतात इतका गोडवा होता की इतक्या वर्षांनंतरही ते मनात घर करून राहीलं. संगणक अभियंता म्हणून काम करू लागल्यानंतर जेव्हा जेव्हा या गीताची आठवण झाली तेव्हा तेव्हा गुगलवर त्याच्या एमपी थ्री चा शोध घेतला, आणि प्रत्येक वेळी निराश होऊन गप्प बसलो. कारण... हे गीत जालावर कुठेच उपलब्ध नव्हतं.

आज सहज म्हणून पुन्हा एकदा शोध घेतला. गुगलने दिलेल्या प्रत्येक दुव्यावर जाऊन पाहीलं. आणि एका दुव्यावर ही युटयूबवरील चित्रफीत सापडली. विक्रांत वाडे नावाच्या गायकाने एका मराठी वादयवृंदामध्ये गायलंय. अगदी मुळ गीताच्या तोडीचं नसलं तरीही खुप छान झालंय गाणं. विक्रांत, धन्यवाद मित्रा. इतक्या वर्षांचा शोध, गाणं मिळत नाही म्हणून मनात असलेली हुरहूर आज संपली...

13 अभिप्राय:

भानस said...

सतिश, अनेक धन्यवाद. छानच आहे हे गाणे. इतक्या वर्षांनी पुन्हा ऐकायला मिळाले मस्त वाटले. लगेच उतरवून घेतलयं.:)

Vikrant said...

अरे मला पण हे हवे होते... फार भूतकाळात नेऊन हैराण करणारे गीत आहे यार !!!!!!

Mohini Puranik said...

धन्यवाद सतीश! मला आता या ओळी हव्या होत्या. गुगल वर तुमचा ब्लॉग मिळाला.. अगदी वेळेवर. नवीन दशकाच्या हरिद्क शुभेच्छा!

Unknown said...

धन्यवाद.. सतीश मन फार उदास होते वाटले कुठुन तरी आनंद शोधू तुझा Blog वाचला वाचून आनंद मिळाला

Prince said...

आनंद या जीवनाचा सगंधापरी दरवळावा..

सतीश तू म्हटलेस त्या प्रमाणे हे शीर्षक गीत
‘दूरदर्शन’ वरील ‘प्रतिकार’ या मालिकेतील नसून
डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘संघर्ष’ या मालिकेतील शीर्षगीत
आहे. प्रसिद्ध नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या
या नाटकातील हे गीत असून त्यामध्ये त्या श्रीमंत बापाची
मुलगी हेच गीत पियानोवर ‘हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली’ असे गीत होती.
पूढे ९०च्या दशकात आशालता आणि डॉ. श्रीराम लागू यांची
भूमिका असलेली संघर्ष ही मालिका आली, ती मधुसूदन कालेलकर
यांच्या ‘चांदणे शिपिंत जा’ या नाटकावर बेतलेली होती आणि
त्यामध्ये ‘आनंद या जीवनाचा’ हे शीर्षगीत होेते.


अर्थात हे गीत विलक्षण सुंदर असून त्या काळी मी केवळ १० वर्षांचा होतो तेव्हा आमच्या टेपरेकॉर्डरमध्ये रेकॉड करुन घेतले होते
ती कॅसेट आजही माझ्याकडे जपून ठेवली आहे.
नील नितीन प्रधान
उपसंपादक नाशिक.

Unknown said...

🌹🌹🙏🙏

शीला नांदखिले said...

धन्यवाद , खूप छान

Unknown said...

Waw.sweet memories of songs and tv serial

Unknown said...

संपूर्ण गाणं नाही मिळणार का

Unknown said...

Will u please share this song. I am searching for it from many years.

Sambhaji said...

सर, खूप धन्यवाद या माहितीबद्दल. तुमच्याकडे हे गाणे असेल तर आमच्याशी शेअर कराल का प्लीज? खूप वर्षांपासून हे गाणे शोधतोय

NITIN BHOSLE said...

कृपया Internet वर share करा

Unknown said...

खूप खूप धन्यवाद...मी पण 9 वर्षाचा होतो तेव्हा माझी बहिण मला हेच गाणं गावून झोपवयची...ते माझ्या अंतर्मनात कोरले गेले आहे...आज पुन्हा एकदा ते एकून फार प्रसन्न वाटले... धन्यवाद मित्रा...